By newseditor on Friday, 25 May 2018
Category: बारामती विधानसभा

वाढत्या महिला अत्याचारांना मुख्यमंत्री जबाबदार- सुप्रिया सुळे

    वाढत्या महिला अत्याचारांना मुख्यमंत्री जबाबदार

पुणे | महाराष्ट्रात महिला अत्याचार वाढत असतील तर ज्यांच्याकडे गृहखातं आहे ते राज्याचे मुख्यमंत्री काय करतात? असा प्रश्न राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. त्या बारामती दौऱ्यावर असताना बोलत होत्या.

राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे. सरकारच्या क्राईम रिपोर्टनुसार महिला अत्याचार गुन्ह्यात महाराष्ट्राचा देशात वरचा क्रमांक लागतो, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांचा आम्हाला सार्थ आभिमान आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave Comments