दादांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
सत्यशोधक समाजच्या स्थापनेस 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये (Saswad) सत्यशोधक समाज परिषदेचं (Satyashodhak Samaj Parishad) आयोजन करण्यात आलं होतं. तिथे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना सुळे यांनी बोलताना सुचक वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या (NCP) गोत्यात देखील खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय
काय म्हणाल्या Supriya Sule ?
राज्यात सध्या वडील पळवायची शर्यत लागलीय, पण माझे वडील माझेच आहेत. ती जागा मी दुसऱ्या कुणाला घेऊ देणार नाही, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. त्या पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ठणकावून सांगितलं. शरद पवार (Supriya Sule father) माझेच वडील आहेत हे रेकॉर्ड करून ठेवा, अशी कोपरखळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मारली. सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय.
दादा (Ajit Pawar) पण दौऱ्यासाठी बाहेर जातो, मी पण बाहेर जाते. दादा रात्री दीड वाजता आला तरी... मला कुणी म्हणत नाही की तू संध्याकाळी 7 वाजता ये. जेवढा दादाला अधिकार आहे तेवढाच मला आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून उजव्या विचारसरणीच्या नेत्यांची खरडपट्टी काढली. लव्ह जिहादचा (Love Jihad) अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही. लव्ह जिहादचा अर्थ असेल तर मी कुणाशीही चर्चा करायला तयार असल्याचं देखील सुळे यांनी यावेळी म्हटलंय.
दरम्यान, सत्यशोधक समाज परिषदेच्या कार्यक्रमाला शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित होते. समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) यांना शरद पवारांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय. शरद पवारांच्या विचाराचा वारसा जर कोणाला घेयचा असेल, तर ते माझ्यापेक्षा ते तुमचे जास्त आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यामुळे सुळे यांचं हे वक्तव्य राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं मानलं जात आहे.