By Editor on Sunday, 26 November 2023
Category: पुरंदर

[LetsUpp Marathi]सदानंदाचा येळकोट म्हणत सुप्रिया सुळेंनी घेतला पॅराग्लायडिंगचा अनुभव

बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जेजुरीत पॅरा मोटरिंग सफरीचा आनंद घेतला. बाराशे फूट उंचीवरून त्यांनी जयाद्री पर्वत रांगातील खंडोबा मंदिर कडेपठार मंदिर ऐतिहासिक पेशवेतला होळकर तलाव व निसर्गरम्य कडेपठारचा डोंगर पाहिला. खासदार सुळे जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमासाठी आल्या होत्या. या महाविद्यालयाच्या जवळच असणाऱ्या कडेपठार रस्त्यावरील फ्लाईंग रायनो पॅरामोटरिंग अॅडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटरला त्यांनी भेट दिली. सेवानिवृत्त पायलट रामचंद्र काकडे यांनी जेजुरी तीर्थक्षेत्र असल्याने पर्यटकांसाठी पॅरामोटरिंग सेंटर उभारले आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी पॅरामोटर मध्ये बसून जमिनीपासून १२०० फुटांवरून जयाद्री पर्वतावर असलेले खंडोबा मंदिर कडेपठार मंदिर व निसर्ग रम्य परिसर पाहण्याचा आनंद लुटला. जेजुरीच्या डोंगर परिसरातील सफर झाल्यावर त्यांनी केंद्राचे संचालक काकडे यांचे कौतुक केले.

Leave Comments