दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना निवडणुकीच्या राजकारणापेक्षा शेतकऱ्यांना मदत करण्याला प्राधान्य द्यावे. सहकारी साखर कारखाने, बँका, दूधसंघ आदींनी चारा डेपो आणि चारा छावणी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच, राज्य सरकारने येणाऱ्या काही निवडणुका पुढे ढकलून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.