खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्ते व इतर विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ४४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांसाठी सुळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर निधी मंजूर झाला असून प्रलंबित कामे तातडीने हाती घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी सुळे यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.