By Editor on Thursday, 01 June 2023
Category: Press Note

मुळशी परिसरातील पुणे ते कोलाड रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे-खा. सुळे

पुणे : मुळशी परिसरातील पुणे ते कोलाड ७५३-ई या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. यामुळे नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी काम अर्धवट राहिले आहे. तरी लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

राज्य रस्ते महामंडळाला याबाबत त्यांनी पत्र लिहिले असून तसे ट्विटही केले आहे. गेल्या तीन वर्षांत चांदणी चौक ते ताम्हिणी घाट या मार्गावर झालेल्या अपघातात जवळपास ६० जणांनी प्राण गमावले आहेत, याची आठवण करून देत ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पिरंगुट परिसरात रहदारीच्या ठिकाणी दोन पुल़ व घोटावडे फाटा चौक येथे खड्डे पडले आहेत. यामुळे येथे वाहतूक कोंडी होत आहे. याखेरीज वाहने घसरुन अपघात देखील होत आहेत. राज्य रस्ते महामंडळाने नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेता हा रस्ता तातडीने दुरुस्त करायला घ्यावा असे सुळे यांनी नमूद केले. 

Leave Comments