खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
पुणे : मुळशी तालुक्यातील माण परिसरात मागील दोन महिन्यापासून कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत हिंजवडी एमआयडीसी विभागाने लवकरात लवकर तोडगा काढून पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण झाली असून हजारो नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी आपल्याकडे तक्रारी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. एमआयडीसीला प्रशासनाने याबाबत पाणी पुरवठा विभागाशी समन्वय साधून लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.