By Editor on Monday, 15 May 2023
Category: Press Note

सिंधुदुर्ग येथील विमानतळास बॅ. नाथ पै यांचे नाव द्यावे

खा. सुळे यांची केंद्राडे मागणी

पुणे : चिपी, सिंधुदुर्ग येथील विमानतळास थोर स्वातंत्र्यसेनानी बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी आहे. याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना टॅग करत त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे बॅ. नाथ पै यांचे जन्मगाव आहे. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून ठसा उमटविला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचे नाव येथील विमानतळास देऊन आपल्या भूमीपुत्राच्या स्मृती जतन करणे सिंधुदुर्गवासियांना शक्य होईल, असे सुळे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबतचा ठराव केला असून १ फेब्रुवारी २०२३ रोजी तो केंद्र सरकारकडे देखील पाठविला आहे. या प्रस्तावावर सकारात्मक विचार करुन तातडीने निर्णय घ्यावा, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.
Leave Comments