By Editor on Monday, 27 March 2023
Category: Press Note

जिल्हा परिषदेच्या ग्रामअभ्यासिकेचा लाभ घेण्याबाबत खा. सुळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

पुणे : पुणे जिल्हा परिषदेने अनु. जाती, अनु. जमाती, वि.जा.भ.ज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या शाहू फुले आंबेडकर ग्रामअभ्यासिकेचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने अनु. जाती, अनु. जमाती, वि.जा.भ.ज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू फुले आंबेडकर ही ग्रामअभ्यासिका सुरु केलेली आहे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सर्व सुविधा माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या अभ्यासिकेत प्रवेशाची अंतिम तारीख १४ एप्रिल आहे. या अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांना लाभ होईल. याबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे आभार. इच्छुक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे सुळे यांनी म्हटले आहे.
Leave Comments