By Editor on Sunday, 28 May 2023
Category: Press Note

पालखी महामार्गावर तात्पुरती मलमपट्टी नको; उत्तम दर्जाचे डांबरीकरण करावे - खा. सुळे

पुणे : राष्ट्रीय पालखी महामार्ग ९६५ वरील भेकराईनगर ते वडकी दरम्यान रस्त्याच्या कडेला पडलेले मोठे हे खड्डे बुजविण्या साठी मातीमिश्रीत व निकृष्ट दर्जाचा मुरुम असल्याच्या तक्रारी आहेत. याठिकाणी उत्तम दर्जाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

याबाबतचे वृत्त माध्यमांतूम प्रसिद्ध झाले आहे. त्याचा दाखला देत सुळे यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ही मागणी केली असून तसे ट्वीटही केले आहे. या मार्गावरुन लवकरच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी जाणार आहे. या रस्त्यावरून जाताना वारकऱ्यांना कसलाही त्रास होऊ न देणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे येथे तात्पुरती मलमपट्टी न करता याठिकाणी डांबरीकरण होणे गरजेचे आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.

यासोबतच या भागातील वाहतूक कोंडीमुळे येथील नागरीक त्रस्त आहेत. त्यामुळे भेकराईनगर ते दिवे घाट या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम देखील लवकर सुरु होणे गरजेचे आहे. आपण या संबंधी सकारात्मक विचार करावा, असे खासदार सुळे यांनी पुढे नमूद केले आहे.
Leave Comments