By Editor on Thursday, 11 July 2024
Category: Press Note

बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गांवर विविध उपाययोजनांची गरज

खासदार सुप्रिया सुळे यांची महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी

 पुणे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील मार्गांवर सर्वच दुभाजकांची ऊंची वाढविण्यात यावी. ही उंची कमी असल्याने पायी जाणारे नागरिक दुभाजकावरुन उडी मारून ते ओलंडतात. याशिवाय नियंत्रण सुटल्याने अथवा टायर फुटल्याने काही वाहने दुभाजकावरून दुसऱ्या लाइनमध्ये शिरत आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत. हे प्रकार थंबवण्यासाठी दुभाजकांची उंची वाढवण्याबरोबरच अन्य अनेक सुधारणा करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.


राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील मार्गांवर वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने सुधारणा करण्याबाबत स्थानिक नागरिक आणि व प्रवाशांच्याकडून करण्यात आलेल्या मागण्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. सुळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज वारजे येथील प्राधिकरणच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. माजी नगरसेवक सचिन दोडके, त्र्यंबक मोकाशी यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गांबाबत तालुकानिहाय करण्यात आलेल्या मागण्या : -

इंदापूर तालुका
१. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ पुणे सोलापुर रोडवर भिगवण ग्रामपंचायत समोर भुयारी मार्ग

२. काळेवाडी नं. १ येथे भुयारी मार्ग 

दौंड तालुका
* पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील दौंड तालुक्यातील वरवंड येथे भुयारी मार्ग
* सहजपुर (LC9) ROB
* यवत येथे उड्डाणपुल

* खडकी येथील बारामती फाट्यासमोर उड्डाणपुल 

हवेली तालुका

* पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत, वरवंड, पाटस, भिगवण या गावांच्या मधून हा महामार्ग जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजना
* उरूळी कांचन पासून यवत पर्यंत उड्डाण पूल
* भेकराईनगर सत्य पुरम ते दिवेघाट रस्त्याचे काम 

पुरंदर तालुका

​* पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर पिसुर्टी रेल्वे क्रोसिंगच्या ठिकाणी उड्डाण पूल
* हडपसर - सासवड रोडचे चौपदरीकरणाचे काम
३. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील कि.मी. १४.००० ते ४०.००० हडपसर ते यवत : पुणे सोलापूर रा. मा. क्र. ६५ वरील कि.मी. हडपसर ते यवत या लांबीत सहापदरी करणासह उड्डाणपूल
* खेड शिवापूर ते मरीआई घाट ते सासवड रस्ता परिसरात रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी निधीची तरतूद
* पालखी महामार्गावरील वाल्हे गावात मंजूर असलेल्या भराव पद्धतीच्या पुलाचे काम थांबवून नवीन सुधारित संपूर्ण पिलर पुलाची मंजुरी
* पालखी महामार्गावर महिन्याच्या वारकऱ्यांकरिता फुटपाथ
* पालखी महामार्गावरील रस्त्याच्या कडेला वटवृक्षांचे पुनर्रोपण
* पालखी महामार्गावरील मुक्काम व रिंगण जागा शासनाने आरक्षित ठेवणे
* हडपसर सासवड पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर वाळूज फाटा येथे अंडरपास, हा मार्ग वाळूज, निळूज पारगाव या गावांना जोडणारा मार्ग असल्याने येथील ग्रामस्थांना देखील सदर ठिकाणी अंडरपास
* पालखी महामार्ग क्र ९६५ वर ग्रामपंचायत वागदरवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे हद्दीमध्ये चैनेज १९१ वर अंडरपास मंजूर असून सदर ठिकाणाहून दौंडज रेल्वे स्टेशन, वडाचीवाडी, पवारवाडी, बहिर्जीचीवाडी, मोरुजीचीवाडी, बाळाजीचीवाडी, झापवस्ती व राख गुळुंचे या गावांना जाणारा रस्ता आहे. याठिकाणी अंडरपास
* आळंदी (पुणे) - पंढरपूर (राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५) जेजुरी शहरासाठी उड्डाणपुल
* पुरंदर तालुक्यातील जेजुरी बसस्थानक ते कडेपठार नाका या परीसरामध्ये हायवे लगत पुण्यश्लोक अहिल्या देवी वि‌द्यामदीर शाळा आहे. या शाळेसमोर स्पिडब्रेकर
* महात्मा जोतीराव फुले विद्यालय व श्री. शंकरराव मुगुटराव कामथे कनिष्ठ महावि‌द्यालय, (विज्ञान), शिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे या विद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग

खडकवासला

​* कात्रज ते नवीन पूल या मार्गाच्या दरम्यान आंबेगाव बुद्रुक येथील भारतीय स्टेट बँक समोर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी नवीन भूयारी मार्ग
* आंबेगाव दत्तनगर येथे अंडरपास तसेच सर्विस रोड वर स्ट्रीट लाईट
* पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाकड ते नऱ्हे पर्यंत संरक्षक भिंत
* शिंदेवाडी ते टोलनाका (शिवापूर) रोडच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडला खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होतात. तरी तातडीने या रस्त्याचे काम करण्यात यावे
* राष्ट्रीय महामार्ग क्र ४ पुणे सातारा रोडवर गोगलवाडी येथे उड्डाण पूल
* राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर वडगाव उड्डाण पूल ते मुठा पूल ते वारजे मार्गावर १२ मीटर रुंदीच्या सर्विस रस्त्याचे सुरू असलेले काम वेगाने पूर्ण करावे
* राष्ट्रीय महमार्ग क्र. ४ वरील मुठा नदीवरील वारजे येथील पुलाचे रुंदीकरण
* भूमकर पूलाची रुंदी वाढविण्यात यावी.
* जांभूळवाडी दरी पुलाच्या डाव्या बाजूस असलेला सर्विस रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावा. 

भोर तालुका

​* भाटघर धरणात प्रजिमा ४३ (करंदी – काम्ब्रे शिवार) व प्रजिमा ४४ ( राजघर – वेळवंड शिवार) यांना जोडणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम
* कापुरहोळ- पुणे रस्त्याची दुरावस्ता आहे सर्वीस रोडवर जागो जागी पाणी साचत आहे शिवापूर जवळ ब्रीजचे काम चालू आहे तिथे रोज तासंतास ट्राफिक जाम होत आहे
* शिवरे येथे रस्त्याचे काम चालू आहे सर्व्हिस रोड अतिशय खराब असून मोठे खड्डे पडले आहेत
* कापुरहोळ उड्डाणपूलाखाली पावसाळ्यात पाणी साचत आहे.

वेल्हे तालुका

महाड – रानवडी – कर्णवडी – मढेघाट – केळद – पासली – भट्टी – वेल्हे – आंबवणे – नसरापूर – चेलाडी फाटा रस्ता (रा.मा.१०६) हा राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करून राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून रस्त्यासाठी निधीची तरतूद 

मुळशी तालुका

​भुगाव व पौड येथे बाह्यवळण रस्ता
* घोटावडे फाटा येथे उड्डाण पूल
* चांदणीचौक ते आदरवाडी रस्ता रुंदीकरण

Leave Comments