By Editor on Monday, 27 February 2023
Category: Press Note

काश्मीरमधील ज्ञानक्रांतीचा भाग व्हा

पुण्यातील सरहद संस्थेच्या आवाहनाला खासदार सुप्रिया सुळे यांचा पाठींबा

पुणे : काश्मीरमधील ज्ञान क्रांतीचा एक भाग होण्यासाठी जगातील सर्वात मोठे पुस्तकांचे गाव, नॉलेज व्हॅली अर्थात ज्ञानाचे खोरे घडविण्यासाठी पुण्यातील सरहद संस्थेने मदत करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाला पाठींबा दर्शवत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे आवाहन पोस्ट केले आहे.

'बुक व्हिलेज' व 'व्हॅली ऑफ नॉलेजच्या' निर्मितीद्वारे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सरहद संस्थेने केले आहे, असे सांगत सरहद ही संस्था गेल्या २५ वर्षांपासून काश्मीरमधील दहशतवाद प्रभावित सीमावर्ती भागात सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात शांतता, परस्पर प्रेम, बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहे, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे. संस्थेच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांची माहिती आणि व्हिडीओ नक्की पहा, असे आवाहन केले आहे. 

Leave Comments