पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील फुरसुंगी ते सासवड दरम्यानच्या कामासाठी सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर काम सुरू करून नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाला केली आहे.
अत्यंत वर्दळीचा हा रस्ता असून सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. या रस्त्यासाठी ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या सध्या दूर झाल्या असून निधी सुद्धा उपलब्ध झाला आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याची गरज आहे. तरी लवकरात लवकर हाती घ्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.