नितीन गडकरी यांना लिहिले पत्र
दिल्ली : पालखी महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील प्रस्तावित उड्डाणपूलास स्थानिक गावकऱ्यांचा विरोध असून ग्रामपंचायतीने तसा ठराव देखील केला आहे. याठिकाणी असलेल्या जोड रस्त्यांचा पर्याप्त वापर योग्य रीतीने होत असल्याने उड्डाणपुलाबाबत फेरविचार व्हावा, अशी मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
केंद्रीय रास्तेवाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते याठिकाणी उड्डाणपूल उभारल्यास फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची शक्यता असून वाहतूकीला अडथळा होण्याची शक्यता आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असल्याचे सुळे यांनी पत्राद्वारे लक्षात आणून दिले आहे.
संभाव्य अडथळा लक्षात घेऊन लासुर्णे ग्रामपंचायतीने उड्डाणपूलांना विरोध करणारा प्रस्ताव मंजूर केला आहे. नागरीकांची सोय आणि इच्छा लक्षात घेता येथील उड्डाणपूल रद्द करण्यात यावा, असे म्हणत या मागणीचा गांभीर्याने विचार करुन निर्णय घ्यावा, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.