By Editor on Wednesday, 07 June 2023
Category: Press Note

विश्वस्त पदाबाबत जेजुरीकरांच्या लढ्याला यश

खासदार सुप्रिया सुळे यांनी केले अभिनंदन

 जेजुरी : अखेर जेजुरीकरांच्या लढ्याला यश आले असून देवस्थान ट्रस्टवर नेमण्यात येणाऱ्या विश्वस्तांमध्ये स्थानिकांनाच प्राधान्य मिळणार हे आता स्पष्ट झाले. असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या समस्त जेजुरीकरांचे अभिनंदन केले आहे.

सुळे यांनी याबाबत ट्विट केले असून ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे नमूद केले आहे. या संपूर्ण लढ्यादरम्यान राज्यभरातील भाविकांनी स्थानिक जेजुरीकरांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली याबद्दल त्यांचे मनापासून आभार. हा लढा लढणाऱ्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.
Leave Comments