By Editor on Friday, 29 September 2023
Category: Press Note

पुसेसावळी दंगलीतील मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळवून द्यावी

खासदार सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी

पुणे : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी (ता. खटाव) येथे उसळलेल्या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या नूरहसन शिकलगार यांच्या कुरुबियांना आर्थिक मदत आणि त्यांच्या पत्नीला नोकरी मिळवून द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. पुसेसवळी येथे १० सप्टेंबर २०२३ रोजी अचानक दंगल उसळली होती. या दंगलीत नूरहसन शिकलगार यांचा मृत्यू झाला. नूरहसन हे त्यांच्या परिवारातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या मृत्यूनंतर हे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांच्या कटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. याबरोबरच त्यांच्या कुटूंबाची कायमस्वरूपी व्यवस्था होण्याच्या दृष्टीने त्यांच्या पत्नीला कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रातून केली आहे.
Leave Comments