By Editor on Thursday, 09 March 2023
Category: Press Note

पुरंदर तालुक्यातील काही गावांच्या कनेक्टिव्हीटीसाठी बीएसएनएलचे टॉवर उभरावेत

खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्राकडे मागणी

पुणे: पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडी, मिसाळवाडी, कुंभोशी, देवडी, दावनेवाडी, शेलारवाडी, पिसाळवाडी, पिंगोरी, सोमोर्डी,वरदवाडी आणि धनकवडी या भागात मोबाईल कनेक्टिव्हीटी अतिशय कमी आहे. तरी या भागात बीएसएनएलचे टॉवर उभारण्यात यावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

केंद्रीय दूरसंचार मंत्री आश्विनी वैष्णव यांना याबाबत खासदार सुळे यांनी पत्र पाठवले असून तसे ट्विट सुद्धा केले आहे. मोबाईल कनेक्टिव्हीटी अभावी पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडी, मिसाळवाडी, कुंभोशी, देवडी, दावनेवाडी, शेलारवाडी, पिसाळवाडी, पिंगोरी, सोमोर्डी,वरदवाडी आणि धनकवडी ही गावे संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. याचा नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

या भागात बीएसएनएल ने पाहणी करुन तेथे टॉवर उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे. तरी दूरसंचार मंत्री आश्विनी वैष्णव यांनी या परिसरात टॉवर उभारण्याबाबत संबंधित विभागाला आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत ते नक्कीच सकारात्मक विचार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave Comments