By newseditor on Friday, 09 February 2018
Category: खडकवासला विधानसभा

नळावरच्या बायकांप्रमाणे मुख्यमंत्री वसावसा भांडतात : सुप्रिया सुळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तापट स्वाभावाचे आहेत. नळावरच्या बायकांप्रमाणे वसावसा-वसावसा भांडतात, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.  त्या पुण्यातील मावळ येथील महिला मेळव्यात बोलत होत्या.

"हा मुख्यमंत्री काही ऐकूनच घेत नाही, त्यांचा पारा नेहमीच चढलेला असतो आणि वसावसा, वसावसा नळावरच्या बायकांप्रमाणे भांडतो. आजपर्यंत मी इतके मुख्यमंत्री पाहिलेत, पण इतका चिडका बिब्बा पाहिला नाही. मुख्यमंत्री आमच्यापेक्षा फारकाही लहान नाहीत. पण मुख्यमंत्रीपद हे खूप मोठ आणि त्यात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे खूपच मोठं आहे. त्यामुळे त्यांनी या पदाचा मान राखावा", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांना गुस्सा क्यूं आता है असं नव्हे तर इनको गुस्साही आता है, असंच म्हणावं लागेल, अशी खिल्ली सुप्रिया सुळेंनी उडवली.

तसंच कधी त्यांना भेटायला जाताना हेल्मेट घालून जावं, काय माहित कधी चिडलेले असताना काही फेकून मारतील, असं म्हणत सुप्रियांनी निशाणा साधला.

  https://www.youtube.com/watch?v=w7g4ef6bM60&feature=youtu.be

Leave Comments