केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर केला. यावेळी विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे दोन टेकूंवर उभ्या असलेल्या म्हणजेच चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटी आणि नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु महाराष्ट्रासाठी या दोन्ही राज्यांच्या तुलनेत तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधकांनी बजेटवरून टीकास्त्र करताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बिहार आणि आंध्र प्रदेश लाडका, मग महाराष्ट्र परका का? असा सवाल विचारला आहे.