"केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याकडून अर्थसंकल्प बजेट सादर करण्यात आला. NDA सरकारकडून सादर करण्यात आलेला हा पहिलाच अर्थसंकल्प बजेट होता. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बजेट मधे 2-4 चांगल्या गोष्टी आहेत, पण त्या चांगल्या गोष्टी काँग्रेस आणि INDIA आघाडीच्या घोषणा पत्रातील असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. देशाच्या बजेट कडून आमच्या अपेक्षा होत्या की सगळ्या राज्याला सारखा निधी मिळावा. बिहार, आंध्रा ला निधी दिला त्याच दुःख नाही पण महाराष्ट्रावर अन्याय का ? असा सवाल सु्प्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.