By newseditor on Monday, 19 November 2018
Category: देश

पार्लमेंटिरियन अवार्ड फॉर चिल्ड्रेननी सुप्रिया सुळेंचा गौरव

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | पार्लमेंटिरियन अवार्ड फॉर चिल्ड्रेननी सुप्रिया सुळेंचा गौरव दिल्ली: खासदार सुप्रियाताई सुळे यांचा युनिसेफने पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेनने गौरव केला आहे. अपंग मुलांसाठी बारामती खासदार क्षेत्रात भरपूर मदतकार्य सुप्रियाताईंनी केलं आहे. या कार्याची दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले.

सुप्रिया सुळेंना याआधीही संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसंच लोकसभेत सर्वाधिक हजेरी, सर्वाधिक प्रश्न विचारले म्हणून त्यांचे कौतुकही करण्यात आले आहे. पण युनिसेफने दिलेला हा पुरस्कार त्यांनी बारामतीत कर्णबधिर मुलांसाठी केलेल्या मदतकार्याची पावती आहे. केवळ आठ तासांत बारामतीतील चार हजार ८४६ कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्र बसवण्याची किमया त्यांनी साधली. या उपक्रमासाठी अमेरिकेतील स्टार्की फाउन्डेशन,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्र्रस्ट या सेवाभावी संस्थांची मदत त्यांनी घेतली. त्यांच्या या कार्यक्रमाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असून इतक्या कमी वेळात चार हजारहून अधिक मुलांना श्रवणयंत्र बसवण्याच्या विक्रमाची नोंद ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.

याशिवाय अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयी,विद्यार्थिनींना केलेला सायकल वाटप या सगळ्या कार्याची दखल युनिसेफने घेत त्यांना हा पुरस्कार दिला.खासदार ,संसदपटू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुप्रिया यांना गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/supriya-sule-awarded-by-unicef/articleshow/66689296.cms