By Editor on Thursday, 23 March 2023
Category: देश

[Letsupp]लोकप्रिय खासदारांच्या यादीत सुप्रिया सुळे नंबर वन

देशातील टॉप टेन खासदारांची यादी जाहीर

नवी दिल्ली : नुकतचं देशातील टॉप टेन खासदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील महिला खासदार असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर या यादीमध्ये राज्यातील आणखी तीन खासदारांनी स्थान मिळवले आहे. या खासदारांमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळेंचा समावेश आहे. श्रीरंग बारणेंनी दुसरा श्रीकांत शिंदेंनी 8 तर राहुल शेवाळेंनी मिळवला 9 वा क्रमांक मिळवला आहे.

देशातील खासदारांच्या संसदेतील कामगिरीवरून ही टॉप टेन खासदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील चार खासदारांचा समावेश आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या जास्त खासदारांचा या यादीमध्ये समावेश आहे. यातील महाराष्ट्रातील महिला खासदार असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच संसदेत प्रश्न मांडत असतात. संसदेतील कामकाजीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

त्यांच्या संसदेतील कामकाजाबद्दल सांगायचं झालं तर या देशातील टॉप टेन खासदारांची यादी जाहीर करण्यात आलेल्या अहवालामध्ये विविध निकषांवर संसदेतील खासदारांच्या कामगिरीचे मुल्यमापन आणि त्यानुसार आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये देखील सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आलेल्या राज्यांमध्येही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तर सर्वात जास्त प्रश्न विचारणाऱ्या खसदारांमध्येही खासदार सुप्रिया सुळे प्रथम क्रमांकावर आहेत. 

त्याचबरोबर या यादीमध्ये राज्यातील आणखी तीन खासदारांनी स्थान मिळवले आहे. या खासदारांमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळेंचा समावेश आहे. श्रीरंग बारणेंनी दुसरा श्रीकांत शिंदेंनी 8 तर राहुल शेवाळेंनी मिळवला 9 वा क्रमांक मिळवला आहे.

Top 10 MPs in India : लोकप्रिय खासदारांच्या यादीत सुप्रिया सुळे नंबर वन, श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळेंनांही स्थान - Letsupp

Leave Comments