By Editor on Wednesday, 07 February 2024
Category: देश

[Zee 24 Taas]राष्ट्रवादी अजित पवारांना मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे लाईव्ह

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि पक्ष निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला बहाल केलं. शरद पवारांनी शून्यातून सुरु केलेला पक्ष काढून घेतला यांचं आश्चर्य नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. हाच निर्णय अपेक्षित होता असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं. आम्ही या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. जे शिवसेनेसोबत केलं तेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत होत असल्याचं सुळे म्हणाल्या. अदृश्य शक्तींनी पवार साहेबांकडून पक्ष ओरबाडून घेतला असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Leave Comments