By Editor on Wednesday, 10 May 2023
Category: देश

[mahaenews]सुप्रिया सुळे पुन्हा एकदा ठरल्या नंबर वन खासदार!

पुणे : संसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या इ-मॅगेझिनचा एप्रिल महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या अहवालात संसदेतील नोंदींनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदरासंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदार ठरल्या आहेत. संसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे.

विद्यमान १७ व्या लोकसभेचा अहवाल आहे. यात २०१९ पासून आतापर्यंत देशभरातील खासदारांनी संसदेतील किती चर्चासत्रांत भाग घेतला, त्यांनी किती खासगी विधेयके मांडली, प्रश्न किती विचारले व त्यांची सभागृहात उपस्थिती किती होती, अशी सर्वांगीण अभ्यासपूर्ण पाहणी केली. खासदार सुळे यांनी सर्वाधिक ७११ गुणांक मिळवत देशातील सर्वोत्कृष्ट खासदार बनल्या आहेत.

विशेष म्हणजे पहिल्या सभातील त्यांची उपस्थिती १०० टक्के भरली आहे. मागील पंचवार्षिक काळात १६ व्या लोकसभेतही सुप्रिया सुळे यांना सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून निवडण्यात आलेले होते. मागील लोकसभेतही त्यांनी ११८१ प्रश्न उपस्थित केलेले होते आणि एकूण २२ खासगी विधेयके मांडली आहेत. तसेच १५२ वेळा चर्चेत सहभागी झाल्या होत्या. मागील संसदेतही त्यांची उपस्थिती १०० टक्के इतकीच होती.

सुप्रिया सुळे पुन्हा एकदा ठरल्या नंबर वन खासदार! – Mahaenews

Leave Comments