राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा घरी न विचारता तसाच बॅंकाकला निघाला. यानंतर तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दाखल करताच सर्व पोलीस यंत्रणा हलली आणि काही तासातच त्याचा शोध लावून त्याला पुण्यात दाखल करण्यात आले. परंतु दुसऱ्या बाजूला बीडमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणाला साठ दिवस उलटून गेले आहेत. तरीही काही आरोपी फरार आहेत. यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरले आहे.