By Editor on Monday, 10 February 2025
Category: देश

[TV9 Marathi]दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनासाठी सुळेंकडून मदतीचं आश्वासन

'राजधानीतील मराठी साहित्य संमेलन दिल्लीत मराठी माणसाचे महत्व वाढवणारे ठरेल', अशा भावना 'मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली' या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केल्या. दिल्ली महाराष्ट्रापासून दूर असली तरीही दिल्लीचे तख्त राखण्यासाठी कायम मराठी माणूस धावला आहे, अशाही भावना मान्यवरांनी बोलून दाखवल्या. सरहद, पुणे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या परिसंवादाचे दिल्लीत आयोजन करण्यात आले. साहित्य संमेलनाची आयोजक आणि सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार हे अत्यंत उत्कृष्ट आयोजन करत आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक चांगले कार्यक्रम राबवले आहेत. ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक होईल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. 

Leave Comments