By newseditor on Tuesday, 02 October 2018
Category: देश

पवारांनी मोदींना क्लीन चीट दिलीच नाही, सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राफेल प्रकरणी जनतेच्या मनात मोदींबद्दल कुठलीच शंका नाही असे वक्त्यव्य करून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी मोदींना क्लीनचीट दिली होती. परंतु शरद पवारांनी मोदींना कुठलीच क्लीनचीट दिलीच नसल्याचे पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“पवारांनी मोदींना राफेल प्रकरणी क्लीनचीट दिली असे वृत्त काही माध्यमांत प्रसिद्ध झाले होते, ते खोटे आहे” असे सुळे यांनी सांगितले तसेच पवारांच्या वक्त्यव्यातील तीन गोष्टींकडे दुर्लक्ष केल्या गेल्याचेही त्यांनी सांगितले. विमानाच्या किंमतीबाबत खुलासा, खरेदी प्रकरणावर जेपीसी समिती नेमणे आणि भाजपच्या दुटप्पी धोरणावर त्यांनी टीका केली. या तीन गोष्टींकडे माध्यमांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

मोदींच्या हेतूबद्दल जनतेच्या मनात शंका नाही! 

तारिक अन्वर यांनी पक्ष सोडल्याप्रकरणी सुळे यांनी आश्चर्य व्यक्त केले तसेच “तारिक अन्वर पक्षस्थापनेपासून सोबत होते, जाण्यापूर्वी पवारांशी बोलून त्यांनी आपले मतभेद दूर करायला हवे होते” असेही त्यांनी यावेळी म्हटले.




http://www.saamana.com/pawar-doesnt-give-clean-chit-to-modi-says-supriya-sule/