By newseditor on Friday, 09 February 2018
Category: देश

सगळ्यांना आत टाका, आम्ही मराठे घाबरत नाही : सुप्रिया सुळे

सगळ्यांना तुरुंगात टाकलं तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही मराठे आहोत, कधीच डगमगत नाही, असं आव्हान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिलं आहे. भुजबळांपाठोपाठ अजित पवार आणि सुनील तटकरे तुरुंगात जातील, असं विधान भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली होतं. त्यानंतर 'दिव्य मराठी' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुळे यांनी ही भावना व्यक्ती केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "किरीट सोमय्या टीका करतात आणि प्रसारमाध्यमं त्यांची वक्तव्य उचलून धरतात. पण टीका करणारी व्यक्तीही भारदस्त असायला हवी. आम्ही प्रसारमाध्यमांशी सुसंवाद ठेवतो याचा अर्थ त्यांनी आम्हाला 'पप्पू' समजू नये. महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसबाबत प्रचंड आदर आहे."

 'आम्ही मराठे घाबरत नाही' 'आम्हाल तुरुंगात डांबलं तरी घाबरणार नाही, मराठे आहोत, डगमगत नाही, शांत बसणार नाही आमचा आवाजही कोणी दाबू शकणार नाही. छगन भुजबळ यांच्या हातून चूक झाली की नाही हे नंतर स्पष्ट होईल. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळ आणि समीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असंही सुळे यांनी स्पष्ट केलं.

Leave Comments