By newseditor on Tuesday, 06 March 2018
Category: देश

महात्मा फुले, सावित्रीबाईंना भारतरत्न द्या: सुळे

महिला शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई या महिला शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी संसदेत केल्याची माहिती सुळे यांनी ट्विटद्वारे दिली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरूवात झाली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी पहिल्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळं त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी थेट लोकसभेत ही मागणी केली आहे.

Mahatma Jyotiba Phule and Savitribai Phule were the pioneers of Girl child education. Requested the government to bestow them posthumously 'Bharat Ratna' in the Parliament under Rule 377.

— Supriya Sule (@supriya_sule) 5 March 2018

महात्मा फुले, सावित्रीबाईंना भारतरत्न द्या: सुळे 
Leave Comments