खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आज १२८ वे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आले त्यावर आपले मत व्यक्त केले.या विधेयकाच्या माध्यमातून महिलांना ३३ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. या विधेयकास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. या विधेयकासोबत कॅनडा येथे घडलेल्या घटनेबाबत सभागृहात चर्चा करण्यात यावी. यासह मराठा, धनगर, लिंगायत यांना आरक्षण देण्याबाबत चर्चा करावी अशी मागणी केली. कांदा प्रश्न, दुष्काळ, अवर्षण आदी मुद्दे देखील महत्त्वाचे असून शासनाने तयारी दर्शविली तर आम्ही यावर चर्चा करु असे सुळे यांनी स्पष्ट केले.