एअरलाईनचीही चौकशी व्हायला हवी-सुळे
[]'वेशांतर करून अमित शाहांना दिल्लीला भेटायला जायचो', या अजित पवारांच्या विधानाने विरोधकांना कोंडीत पकडण्याची आयती दिली आहे. खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर हल्ला चढवला आहे. अजित पवार नाव बदलून करणे, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे सांगत भाजपला काही सवाल सुप्रिया सुळेंनी केले आहेत.