By Editor on Saturday, 18 February 2023
Category: वेल्हा

[Sakal]तोरणा गडावरील उर्वरित रस्त्याच्या निधीसाठी प्रयत्न करणार-खासदार सुप्रिया सुळे

 वेल्हे - किल्ले तोरणा (ता.वेल्हे ) गडावरील पार्किंग पर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्याच्या निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळेयांनी केले. शुक्रवार (ता.१७) रोजी सकाळी दहाच्या दरम्यान गडावरील बिन्नी दरवाजा डागडुजी व इतर कामाची खासदार सुप्रिया सुळे कडून करण्यात आली यावेळी सुळे बोलत होत्या. स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगडास नोव्हेंबर मध्ये भेट देऊन पाहणी केल्यानंतर तीन महिन्यात स्वराज्याचे तोरण असलेल्या तोरणा गडास आज भेट दिली. गडाच्या बिन्नी दरवाजा डागडुजी व इतर कामाची खासदार सुप्रिया सुळे कडून पाहणी करण्यात आली.

यंदाच्या आर्थिक वर्षात शासनाने मंजूर केलेल्या साडे चार कोटी रुपयांच्या निधीतून गडाच्या मुख्य बिन्नी दरवाजा डागडुजी,दुरुस्ती तोरणाजाई मंदिर, तळे,म्हसोबा टाके , श्री मेंगाईदेवी मंदिर आदीची दुरुस्ती, खोकळ टाके ते मेंगाई मंदिर मार्गवर फरशी आदी कामे केली जाणार आहेत. 

या पाहणी दरम्यान जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष गणेश शिंदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेवन्नाथ दारवटकर, निर्मला जागडे ,माजी अध्यक्ष शंकरराव भूरुक,कात्रज दुध संघाचे संचालक भगवान पासलकर,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण राऊत, तालुकाध्यक्ष संतोष रेणूसे,राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी अध्यक्ष शंकर भुरुक, माजी युवक अध्यक्ष विकास नलावडे, कार्याध्यक्ष रमेश शिंदे, माजी सरपंच संतोष मोरे,सुनील राजीवडे, प्रदीप मरळ,गोरक्ष भुरूक,प्रमोद लोहकरे,मोहन काटकर,सुनिल कोळपे,अमित माने आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

विद्युतीकरणही मार्गी लागणार

​तोरणागडाच्या तटबंदी पर्यंत वीज पुरवठा सुरू आहे. तेथुन पुढे किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे गडावरील विद्युतीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडुन काम केले जाणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध आहे.असल्याचे पुरातत्व विभागाने स्पष्ट केले आहे

Pune : तोरणा गडावरील उर्वरित रस्त्याच्या निधीसाठी प्रयत्न करणार ; खासदार सुप्रिया सुळे | Sakal

Leave Comments