मदर्स रिलेशनशिप चांगले शिक्षण आणि चांगले संस्कार आपल्याकडून कोणीही घेऊ शकत नाही, असे मत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. माता अमृतनंदामाई मठातर्फे बुधवार (दि. 12) पासून हिंजवडी फेज 3 (भोईर वाडी) येथे अमृता विद्यालयम सुरू होत आहे. विद्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 9) खासदार सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी डॉ. मनमथ मनोहर घरोटे आणि स्वामी विद्याम्रितानंद पुरी हे यांचीही प्रमुख उपस्थितीत होती. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शाळेच्या बोर्डाच्या उद्घाटनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. (Hinjawadi) त्यानंतर दीप प्रज्वलन सोहळा संपन्न झाला. डॉ. मनमथ घरोटे यांनी अध्यात्म शिक्षण व संस्कार या विषयावर विचार मांडले.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, संस्करण बाबतीत सर्वांचे मत एकच आहे. फक्त देण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. आपली आई आपल्यावर बिनशर्त प्रेम करते. आपली आई आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा भाग साकारते. म्हणून तिने केलेल्या संस्कार हे कायम आपल्याबरोबर राहतात. विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी मदर्स रिलेशनशिप हे पुस्तक प्रकाशित केले. त्याचे खासदार सुळे यांनी कौतुक केले स्वामी विद्याम्रितानंद पुरी यांनी विद्यालया बाबतीत माहिती दिली. हे विद्यालय 12 एप्रिल 2023 पासून सुरु होणार आहे. सुरुवातीला विद्यालयात सहावी पर्यंत वर्ग असतील, असे त्यांनी सांगितले.
Hinjawadi : चांगले शिक्षण व चांगले संस्कार आपल्याकडून कोणीही घेऊ शकत नाही - सुप्रिया सुळे - MPCNEWS