सुप्रिया सुळेंचा सरकारला अल्टिमेटम
आयटी पार्क हिंजवडी, मान, मारुंजी येथील रस्ता, वाहतूक कोंडी आणि जल कोंडी सारख्या पायाभूत समस्या सोडविण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी मला अजूनही हवा तसा वेळ दिला नाही असा दावा बारामती लोकसभा क्षेत्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
आयटी पार्क हिजवडी, मान आणि मारुंजी येथील पायाभूत समस्या सोडविण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावली आहे, अशी मला माहिती मिळत आहे. त्याविषयी मी त्यांची आभारी आहे. मात्र आयटी पार्क आणि त्या भोवती असलेल्या गावाच्या पायाभूत समस्या सोडविण्यासाठी एक कॉपिटंट ऑथॉरिटी नेमण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आयटी पार्कच्या परिसर हा महापालिकेत जावा किंवा नाही याविषयी जो पण लोकहिताचा निर्णय या भागातले लोकप्रतिनिधी घेतील त्या मताशी मी सहमत आहे.
आम्ही या भागातील संबंधित यंत्रणांना 26 जुलै पर्यंत ची तीन आठवड्याची मुदत दिली आहे. या तीन आठवड्यात या भागातील संबंधित शासकीय यंत्रणांनी पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावावे अशी आमची मागणी आहे आमचे पायाभूत तीन आठवड्याच्या आत मार्गी लागले तर, आम्ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करू अन्यथा पुढची भूमिका आम्ही ठरवू असा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
राज्य आणि देशाच्या राजकारणात फक्त ठाकरे कुटुंबीय नव्हे तर बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या शिवसेनेतील प्रत्येक सदस्याचा तेवढाच वाटा आहे त्यामुळे जर अशा कुटुंबातील दोन भावंड एकत्र येत असतील तर त्याच अगदी मनापासून मला आनंद आहे आणि आपण सर्वांनी देखील त्याचं स्वागत करायला हवं अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे. एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही. आम्ही आमच्या कामात व्यस्त आहोत असं स्पष्टीकरण देखील सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर दिला आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात परवा महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने गुन्ह्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मी सुद्धा केंद्र सरकारच्या गुन्हेगारी विषयाच्या संबंधित असलेल्या कमिटीवर सदस्य आहे, आणि राज्यात गुन्हेगारीत वाढ होत आहे अशी कडेवारी आम्हाला स्वतः केंद्र सरकारने दिली आहे. अशी टीका करत सुप्रिया सुळे यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून युती सरकारला घेरल आहे.
'२६ जुलैपर्यंत परिस्थिती सुधारली नाही तर....', सुप्रिया सुळेंचा सरकारला अल्टिमेटम