कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात बंद पडते.... वरून मी म्हणणारे ऊन, सावलीला थांबावे, तर रस्त्यावर जवळपास कुठे झाड नाही, अशा उन्हाच्या काहिलीत रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखरं होत धावून गेल्या. दौऱ्यानिमित्त भोरच्या दिशेने निघालेल्या सुळे यांनी स्वतःच्या गाडीसह कार्यकर्ते आणि अन्य वाहनांसह मागून आलेल्या एसटी बसमधून सर्व प्रवाशांना खेड शिवापूर टोल नाका आणि अन्य सावली असलेल्या ठिकाणी पोहोचवले.