स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद
खासदार सुप्रिया सुळे यांनी बैलगाडीची सफर करत स्ट्रॉबेरीच्या शेतात फेरफटका मारला.खासदार सुप्रिया सुळे यांनी बैलगाडीची सफर केली आहे.बैलगाडीची सफर करुन त्या थेट स्ट्रॉबेरीच्या शेतात पोहचल्या.पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीमधील स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी त्या गेल्या होत्या.त्यावेळी त्यांनी स्ट्रॉबेरी चाखली आणि बैलगाडीतून सफर केली.यावेळी त्यांनी प्रयोगशील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्याचं कौतुकही केलं.त्यांनी या स्ट्रॉबेरी शेतीबाबत माहिती घेतली.सुप्रिया सुळे यांच्या या भेटीच्या दरम्यान गावकऱ्यांनीदेखील गर्दी केली होती.शेतीत नवनवीन प्रयोग केले पाहिजे जेणेकरुन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.