वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवरायांच्या लोककल्याणकारी कार्याचा वारसा असलेले वेल्हे तालुक्यातील पानशेत, मोसे खोरे किल्ले रायगडला जोडणार्या शिवकालीन राजमार्ग घोल ते माणगाव रस्त्याचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. कुरण बुद्रुक(ता.वेल्हे) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. कुरण बुद्रुक येथे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन , भूमिपूजन खा.सुळे यांच्या हस्ते झाले.
जिल्हा दूध संघाचे संचालक भगवान पासलकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे , जिल्हा बँकेचे संचालक निर्मला जागडे, प्रवीण शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राऊत, जिल्हा सरचिटणीस तानाजी मांगडे, तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, सरपंच कीर्ती देशमुख, युवक अध्यक्ष प्रमोद लोहकरे ,अंकुशभाऊ पासलकर, संपत मोरे आदी उपस्थित होते. भगवान पासलकर यांनी शिवभक्तांची स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची मागणी पूर्ण होईल, असे सांगितले. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष किरण राऊत यांनी पानशेत खोर्याच्या घाटमाथ्यावरील किल्ले तसेच शिवकालीन मंदिरे, ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली.पुणे : पानशेत खोरे राजमार्गाने रायगडला जोडणार : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी