By Editor on Wednesday, 25 January 2023
Category: भोर विधानसभा

[Loksatta]“देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”, सुप्रिया सुळेंची टीका

म्हणाल्या, "उगाच खोट्या- नाट्या गोष्टी पसरवू नका"

 महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे यांना महाविकास आघाडीने माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. "देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी. राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. यावर राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. यावर काही न बोलत त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले याचे मला आश्चर्य वाटत आहे", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हिंजवडीत सुप्रिया सुळेंनी स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली. स्ट्रॉबेरी शेतकरी मल्हार साखरे यांची सुप्रिया सुळेंनी पाठ थोपटली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांचे विधान हे हास्यास्पद आहे. दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या विधानावर सविस्तर बोलले आहेत. देवेंद्र जी आपस ये उम्मीद न थी अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा पुण्यात कोयता गॅंग, धायरीत गोळीबार झाला अशा घटना घडल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी यावर बोलणे अपेक्षित होते. त्यांना विनम्र विनंती आहे की, पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. अशी परिस्थिती त्यांनी यावर बोलावे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर मला आश्चर्य वाटले आहे. नागरिकांची सुरक्षा करणे याला त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडी निर्णय घेईल. अजित पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल. पुढे त्या म्हणाल्या की, भाजपा कोणाला उमेदवारी देणार हे माहिती नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. बिनविरोध निवडणुकीबाबत मी तर्कवितर्क लावू शकत नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

supriya sule reaction-on-devendra-fadanvis-allegations-against-mahavikas-aghadi | Loksatta

Leave Comments