By Editor on Tuesday, 13 February 2024
Category: बारामती

[azadmarathi]निखील वागळे यांच्यावर हल्ला होत असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत होते – सुळे

भारतरत्न लालकृष्ण अडवाणी (Lalkrishna Advani) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) हे भाजपाच्या रडारवर आहेत. अशातच आता काल संध्याकाळी निखील वागळे यांच्या गाडीवर हल्ला (Nikhil Wagle Car Attack ) झाला आहे. काही संतप्त कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेक आणि अंडी फेक देखील करण्यात आली आहे. संबंधित प्रकरामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचे आता पडसाद उमटत असून विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला करीत दगडफेक केली. या संतापजनक घटनेत रस्त्यावरुन जाणाऱ्या काही मुली जखमी झाल्या. हा प्रकार घडत असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत होते. याप्रसंगी कारवाई न करण्याचे आदेश पोलीसांना कुणी दिले होते का? अशा पद्धतीने जाहिर हुल्लडबाजी करण्याचे लायसन्स भाजपाला कुणी दिले? या देशात विचारांचा प्रतिवाद विचारांनी करण्याची फार मोठी परंपरा आहे. भाजपाला ही परंपरा खंडीत करुन हुल्लडबाजांचे राष्ट्र अशी ओळख निर्माण करायची आहे का? या घटनेचा तीव्र निषेध.असं त्यांनी म्हटले आहे. 

Nikhil Wagle Car Attack | निखील वागळे यांच्यावर हल्ला होत असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत होते - सुळे - azadmarathi.com

Leave Comments