By Editor on Saturday, 07 October 2023
Category: बारामती

[sarkarnama]सुप्रिया सुळेंचा 'महाशक्ती'वर शाब्दिक हल्ला

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्षात दोन गट निर्माण होत दोन्ही गटातील संघर्ष थेट निवडणूक आयोगात गेला. निवडणूक आयोगात यावर शुक्रवारी सुनावणी देखील झाली. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता पुढची सुनावणी येत्या सोमवारी दुपारी चार वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवरच बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी-शाहांवर निशाणा साधला. "दिल्लीच्या अदृष्य शक्तीमुळे महाराष्ट्राची प्रगती नव्हे अधोगती झाली", असा शाब्दिक हल्ला त्यांनी केला.

"सुसंस्कृत विचाराने पुढे जाणारे पूर्वीचे भाजपचे नेते आणि आत्ताच्या भाजप नेत्यांमध्ये पूर्ण विरोधाभास आहे. या भाजपला आगामी लोकसभेच्या निवडणुकीत जनता नाकारणार आहे. दिल्लीचे अदृष्य हात महाराष्ट्रासह अनेक राज्यात फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष बळी पडला. मात्र, आम्ही 'इंडिया'वाले भाजपच्याविरुद्ध लढणार आणि जिंकरणार देखील", असा निर्धार खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. त्या शुक्रवारी माळेगाव (ता.बारामती) येथे माध्यमांशी बोलत होत्या.

"राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक आयोगातील सुनावणी आगोदरच आम्हाला चिन्ह व पक्ष मिळणार असे आमच्यातून निघून गेलेले नेते मंडळी बोलून दाखवितात. त्यामुळेच पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाने स्वतंत्रपणे सुप्रिम कार्टात आमच्यातून बाजूला गेलेल्यांविरुद्ध अपिल केले आहे", असे त्या म्हणाल्या. "भाजपची रणनिती ही संविधान टिकण्याच्या दृष्टीने धोकादायक असून भाजपचे नेते दिल्लीत एक आणि राज्यात एक अशी भूमिका घेत आहेत. मराठा, धनगर अरक्षणाचे मुद्दे मागे राहिले. महिला विधायक मंजूर करून महिलांना बेरर चेक दाखविला खरा, पण त्या चेकवर दिनांक टाकली नाही. त्यामुळे दिल्ली वगळता देशात कोठेही महिलांकडून या मंजूर विधायकाबाबत स्वागत अथवा जल्लोश झाला नाही, असंही त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंचा 'महाशक्ती'वर शाब्दिक हल्ला; म्हणाल्या... MP Supriya Sule strongly criticized Narendra Modi-Amit Shah and BJP

Leave Comments