बहिण-भावाच्या नात्यातील गोड क्षण टिपणारा व्हिडिओ शेअर
गेल्या काही महिन्यांत पवार कुटुंबामध्ये झालेल्या राजकीय संघर्षानंतर दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा. नात्यांतील गोडव्याची अनुभूती देणारे क्षण अनुभवायला मिळाले आहेत. आज (१५ नोव्हेंबर) भाऊबीजेनिमित्त अजितदादा आणि सुप्रियाताई पुन्हा एकदा एकत्र दिसले. बहिण-भावाच्या पवित्र नात्याची वीण घट्ट करणारा सण असं म्हणत सुप्रियाताईंनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.