सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून बारामतीत उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्र सरकार असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. मराठा, धनगर, मुस्लिम व लिंगायत आरक्षणासाठी राष्ट्रवादी कायम या समाजासोबत असून येत्या अधिवेशनात संसदेत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्या म्हणाल्या.