By Editor on Thursday, 08 June 2023
Category: बारामती

[the karbhari]बारामती आणि दौंड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासासाठी १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर

खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok sabha constituency) बारामती आणि दौंड तालुक्यांत (Baramati and Daund taluka) प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health centers) तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी एकूण १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी ही माहिती दिली. (Primary Health Centers)

या निधीमधून बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी ७६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर सांगवी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ३ कोटी ६५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. (MP supriya Sule News)

याबरोबरच दौंड तालुक्यातील रावणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत आणि कर्मचारी निवासस्थान बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी २२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. (Baramati News)

Primary Health Centers | बारामती आणि दौंड तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचारी निवासासाठी १२ कोटी ६३ लाख रुपये मंजूर | खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती - TheKarbhari

Leave Comments