[Maharashtra Times]महाविकास आघाडीत किती जण आले, याबाबत तुम्ही मला प्रश्न विचारत नाही - सुप्रिया सुळे
ऐन आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे जवळचे कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ही बाब माझ्या कानावर आली आहे. मात्र ते कोणते कार्यकर्ते आहेत ? कोण आहेत ? हे काही मला माहित नाही! याबाबत रोहितशी बोलून माहिती घेईल. असे सांगत भाजपमध्ये गेलेले कार्यकर्त्यांबाबत तुम्ही विचारता मात्र महाविकास आघाडीमध्ये किती जण आले. याबाबत तुम्ही प्रश्न विचारात नाही. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पितृ पंधरवाड्यानंतर अनेक जण महाविकास आघाडीत येणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले होते. यावर विचारले असता खासदार सुळे यांनी राम कृष्ण हरी असे म्हणत प्रतिक्रिया दिली. लाडकी बहीण योजनेवर बोलताना सुळे म्हणाल्या की, लवकरच चौथा ही हप्ता येऊ शकतो. इलेक्शन मध्ये त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही ही नाही. लोकसभेच्या अगोदर यांना बहिणी आठवल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर यांना बहिणी आठवल्या. विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात आणि देशात काय पद्धतीने विकास झाला आहे. हे सर्वजण पाहत आहोत. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार तसेच एकाच योजनेचे युतीतील वेगवेगळे श्रेयवाद घेत आहेत. बॅनरबाजी आणि श्रेयवाद सातत्याने दिसून येत आहे.
आरक्षणा संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना सुळे म्हणाल्या की, सध्याचे ट्रिपल इंजिन खोके सरकार याला जबाबदार आहे. मराठा, धनगर लिंगायत मुस्लिम व भटक्या विमुक्त समाजाच्या अनेक वर्षांच्या मागण्या आहेत. सातत्याने गेली दहा वर्ष मोदी सरकार आणि गेली शंभर दिवस इंडियाचे सरकार जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली. तेव्हा तेव्हा म्हणाले आहे की, जे सरकार आरक्षणाचे बिल आणेल त्याला आमचा पाठिंबा असेल.

