1 minute reading time
(72 words)
[Maharashtra Times]मविआचे आमदार फुटणार? Uddhav Thackeray यांच्या नाराजीनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
ऑपरेशन टायगर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील आमदारही फुटण्याची चर्चा आहे. मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच बुधवारी महाविकास आघाडीने आमदारांची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला तिन्ही घटक पक्षांच्या एकूण ६० आमदारांपैकी फक्त ३७ आमदारच उपस्थित राहिले होते. यावरून उद्धव ठाकरे यांनी आघाडीबाबत चिंता व्यक्त केल्याची माहिती आहे. "महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

