2 minutes reading time (384 words)

[Maharashtra Times]आता पक्षात ओरिजिनल राहिलेच कोण? भाजपचं कॉंग्रेसीकरण झालंय, सुप्रिया सुळेंची टीका

आता पक्षात ओरिजिनल राहिलेच कोण? भाजपचं कॉंग्रेसीकरण झालंय, सुप्रिया सुळेंची टीका

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतील नेत्यांना महायुतीत घेणार असले तरी भाजपमध्ये आता ओरिजिनल राहिलेच कोण ? भाजपचे आता काँग्रेसीकरण झाले आहे', अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर पक्षातील नेत्यांना महायुतीत घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबद्दल विचारले असता सुळे म्हणाल्या, 'तुम्ही संसदेत गेल्यावर व्हिजिटर गॅलरीमधून एक नजर टाकली तर भाजपत गेलेल्यांमध्ये इतर पक्षांतील नेत्यांचीच संख्या अधिक दिसते. विरोधी पक्षात असताना भाजपमधील ज्या नेत्यांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या, सतरंज्या उचलल्या, ते लोक आज कुठे आहेत? त्यांचे आणि आमचे विचार वेगळे असले तरी भाजपकडून ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला, त्यांच्याबद्दल आदर आहे.

संसदेत काम करताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्याकडून शिकायला मिळाले. तेव्हाचा भाजप सुसंस्कृत पक्ष होता. आता तसे वातावरण राहिलेले नाही.' घायवळ बनावट पासपोर्ट प्रकरणाच्या चौकशीबद्दल विचारले असता सुळे म्हणाल्या, 'या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उशिरा का होईना, चौकशी करणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांचे जाहीर आभार मानते. या देशात शेतकरी कर्ज काढायला जातो तेव्हा त्याला दहा प्रश्न विचारले जातात. त्याचे अर्ज अमान्य करण्यात येतात.

एक गुंड बनावट पासपोर्ट बनवून देश सोडून जातो, है अत्यंत गंभीर आहे. पासपोर्ट, इमिग्रेशनच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना एक व्यक्ती बनावट पासपोर्ट बनवून देशाबाहेर जाऊ शकते हे धोकादायकच नव्हे तर अत्यंत चिंताजनक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाची चौकशी करावी.' राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, 'राज्यात गुन्हेगारी वाढली, हे दररोज प्रसारमाध्यमे व पोलिसांकडे असलेल्या माहितीवरून दिसून येते.

पुण्यातील गुन्हेगारीचे तर विचारूच शिकायला येतात. ते शिक्षणाचे माहेरघर आहे. असे असताना इतकी गुन्हेगारी वाढत असेल तर याचे उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी द्यावे. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही, हेही वारंवार दिसून येत आहे. राज्य सरकारमधील मंत्रीच त्यांना मिळणाऱ्या निधीत कपात होत असल्याची ओरड करत असतात, हे अत्यंत चिंताजनक आहे. यावर वेळीच उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक आहे.'

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. आम्ही यापूर्वी कधीच या निवडणुका एकत्र लढलेल्या नाहीत. महायुतीची काय भूमिका असेल, हा त्यांचा विषय आहे. आमच्याकडे आमचे अधिकार आहेत. येत्या काळात या निवडणुकांबद्दल सर्व गोष्टी स्पष्ट होतील असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. 

...

ncp mp supriya sule criticized that bjp has now become congressified; | Maharashtra Times

Supriya Sule On BJP: भाजपमध्ये आता ओरिजिनल राहिलेच कोण ? भाजपचे आता काँग्रेसीकरण झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
[Lokshahi]'8 महिन्यांपासून शिवभोजन थाळी चालक महिला...
[Lokshahi]संग्राम जगतापांना नोटीस! सुप्रिया सुळेंन...