1 minute reading time
(91 words)
[ABP MAJHA]आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चलतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला. आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही असेही त्या म्हणाल्या. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी टीका केली. पत्ते तुम्ही खेळायचे आणि कोर्टात चकरा आम्ही मारायच्या का? असा सवाल सुळेंनी केला. तुमची आब्रु तुमच्याच माणसाने घालवली. व्हिडीओ कोणी काढला? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. रोहित पवार यांना सारख्या नोटीस येतात. पण आमचा रोहित घाबरत नाही असेही सुळे म्हणाल्या.

