1 minute reading time
(87 words)
[TV9 Marathi]'Walmik Karad ची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करा', Supriya Sule यांची मागणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या आरोपी वाल्मिक कराडचा तुरुंगातही पाहुणचार सुरू असल्याची ओरड सातत्याने होत असते. बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील पोलिसांकडून त्याचा आणि आरोपींचा बडेजाव केला जातो, त्यांना आवश्यक ती सुविधा पुरवली जात असल्याचा आरोपही दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. आता, याच आरोपावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya sule) ट्विट करुन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. त्यामध्ये, आरोपी वाल्मिक कराडची (Walmik Karad) नागपूर कारागृहात रवानगी करावी, असे त्यांनी म्हटलं आहे.

