2 minutes reading time (436 words)

[Maharashtra Times]"हे सरकारचं नाकर्तेपण आहे, आम्ही..." फडणवीस सरकारवर सुप्रिया सुळे कडाडल्या, काय म्हणाल्या नेमकं?

"हे सरकारचं नाकर्तेपण आहे, आम्ही..." फडणवीस सरकारवर सुप्रिया सुळे कडाडल्या, काय म्हणाल्या नेमकं?

पुणे : सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला, रोहित पवार यांना ईडीची नोटीस आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. हिंजवडी-कात्रज रस्त्यावरील वाहतूक कोंडीसाठी त्यांनी सरकारला धारेवर धरले. गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत, रोहित पवार यांना विरोधक असल्यामुळे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सरकारचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी दर आठवड्याला हिंजवडी ते कात्रज चौकापर्यंतच्या रस्त्याचा आढावा घेते." या रस्त्यावर नियोजनाशिवाय खोदकाम केले जात आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. सरकार उशिरा जागे झाले असले, तरी आम्ही पाठपुरावा करत आहोत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे वाहतूक कोंडी होत आहे, असे त्या म्हणाल्या. "पालकमंत्र्यांनी आढावा घेतला आहे, आता बघूया काय होते" असेही त्या म्हणाल्या. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या की, "मी आणि शरद पवार आम्ही प्रवीण गायकवाड यांच्याशी बोललो आहोत. आम्ही या घटनेचा निषेध करतो. याप्रकरणी त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करते. हे फार धक्कादायक आहे की हल्लेखोरांवर कारवाई होत नाही."

रोहित पवार यांना ईडीने नोटीस पाठवल्याबद्दल सुळे म्हणाल्या, "रोहित पवार यांना टार्गेट करण्यात आलं आहे. पहिल्या लिस्टमध्ये रोहितचे नाव नव्हतं. विरोधी पक्षात आहे म्हणून टार्गेट केले जात आहे." त्यांच्याकडे पिस्तूल सापडले आहे, त्यामुळे त्यांच्यावर आरोप होत आहेत. हा मुद्दा दिल्लीत मांडणार असल्याचे त्या म्हणाल्या.
जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता सुळे म्हणाल्या, "जयंत पाटील यांचा राजीनाम्याची बातमी चॅनेलवर पाहिली, मी त्यांचा राजीनामा पाहिलेला नाही. जयंत पाटील यांच्याशी मी रोज बोलते. पण याबद्दल मला कल्पना नव्हती. जयंत पाटील हे संघर्ष करणारे नेते आहेत." असेही त्या म्हणाल्या.

शिरसाटांकडे सापडलेल्या नोटांबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या, "मंत्री मारत आहेत पैसे सापडत आहेत, नोटबंदीचे काय झालं? ब्लॅक मनी हटवण्यासाठी नोटबंदी आणली होती. एका मंत्र्यांच्या घरी नोटांची बॅग सापडली हे चिंताजनक आहे, या प्रकाराबाबत मी निर्मला सीतारामन यांना सांगणार." असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. भाजपमध्ये काँग्रेसमधून आलेल्या लोकांबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या, "भाजपमध्ये आज 100 टक्के काँग्रेसवाले आहेत, संजय जगताप, संग्राम थोपटे असू हे कधी ना कधी काँग्रेसमध्ये होते, सर्व टॅलेंट काँग्रेसमध्ये आहे तुमच्यात नाही कां?" असा सवालही त्यांनी विरोधकांना केला.

त्या पुढे म्हणाल्या की, "आम्ही आणि शिवसेना सुप्रीम कोर्टात दर 15 दिवसांनी आम्ही जात असतो, जो न्याय होई तो होईल मात्र आम्ही संघर्ष करत राहणार." राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. गुडलक कॅफेत जे घडले ते धक्कादायक होते. यामध्ये सुधारणा अपेक्षित असल्याचेही त्या म्हणाल्या. 

...

Supriya Sule Targeted Mahayuti Government In Pune;पुण्यात सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला

Pune News : रोहित पवार यांना ईडीने नोटीस पाठवल्याबद्दल सुळे म्हणाल्या, "रोहित पवार यांना टार्गेट करण्यात आलं आहे. पहिल्या लिस्टमध्ये रोहितचे नाव नव्हतं. विरोधी पक्षात आहे म्हणून टार्गेट केले जात आहे." त्यांच्याकडे पिस्तूल सापडले आहे, त्यामुळे त्यांच्यावर आरोप होत आहेत. हा मुद्दा दिल्लीत मांडणार असल्याचे त्या म्हणाल्या.
[Lokmat]खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना.... ...
[News24 Pune]पुणे बाजार समितीच्या कारभाराची सखोल च...