1 minute reading time
(100 words)
[TV9 Marathi]प्रत्येक जिल्ह्यात लोककलेचं एक केंद्र असावं'
शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय कलावंत मेळाव्यास उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. आजच्या २१ व्या शतकांत आपली ओळख आणि संस्कृती असलेली लोककला जिवंत ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला जात आहे, त्याबद्दल कलावंतांचे कौतुक केले. तसेच लोक कलावंतांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी विनंती केली. तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून लोककलेचा ठेवा कसा जपून ठेवता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. याप्रसंगी शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम बुवा शेलार, जगदीश सर, डॉ. सावंत, अँड. भिलारे, भावना घाणेकर, सुरेश पाटील, अँड. जाधव, अरुण शिंदे, म्हात्रे ताई, अँड. अनंत सपकाळ यांच्यासह लोक कलावंत उपस्थित होते.

